हरि ओम.
रामो राजमणि सदा विजयते।
हा मोठ्या आईने दिलेला वर म्हणजे प्रत्येक वानरसैनिकासाठी विजयाची ग्वाहीच. जो रामराज्याच्या वाटेवर चालायला लागला. तो वानरसैनिक झालाच. म्हणून आम्हाला या रामराज्याच्या वाटेवर आणण्यासाठी वानरसैनिक बनविण्यासाठी बापूराया अविरत श्रम घेत आहेत. येणार्या काळाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी घोरकष्टोद्धरण स्तोत्र आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरावे ही सद्गुरु बापूंची तळमळ. आणि त्यासाठी स्थापना झाली अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची आणि याचाच एक भाग आहे अनिरुद्धाज परेड पथक. ही परेड आम्हाला समान पातळीवर नेऊन कार्य करण्यास शिकविते. आपल्य शरिर, मन आणि बुद्धी ह्यांस अनुशासन लावण्यास मदत करिते. परेड पथकाचे आजच्या दिवशी होणारे संचलन ही केवळ मानवंदना नाही तर हे शारण्य आहे. प्रत्येक अनिरुद्ध सैनिकाचे आपल्या लाडक्या बापूंचरणी. ही शपथ आहे, रामराज्या कार्यात एकजुटीने, पूर्ण क्षमतेने सहभागी होण्याची. आणि ही सलामी आहे आई, बापू व दादांच्या आमच्या वरील उत्कट प्रेमाला दिलेली.



0 comments :
Post a Comment